स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रात तिरंगा रॅली सह विविध कार्यक्रम

47

 

बल्हारशाह,प्रतिनिधी-
स्वातंत्राच्या अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभीयान दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधी संपुर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे . त्याचा एक पर्व म्हणुन मध्य चांदा वनविभाग , वनपरिक्षेत्र बल्हारशाह , संयुक्त वनव्यवस्थापन समिती , उमरी पोतदार मार्फत उमरी पोतदार येथे तिरंगा रॅली , वृक्षारोपन व सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरवात आदीवासी वादय व रेला नृत्यसह करण्यात आली . या कार्यक्रमात माजी पंचायत समिती सभापती अल्काताई आत्राम , सरपंच ठामेश्वरी लेनगुरे ,उपसरपंच मंगेश पिपरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे , वनपरिक्षेत्र सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेरकी , संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश्वर परचाके ,आंबेधानोराचे अध्यक्ष सिताराम मडावी , मंगेश पिपरे. बंडुजी लेनगुरे , मनोज मुलकलवार , दिवाकर तोडासे , परिक्षाविधींन वनपरिक्षेत्र अधिकारी निशा नवले , व उमरी पोतदार तसेच सयुक्त वनव्यवस्थापन समिती उमरी तुकुम चे पदाधिकारी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

सर्व प्रथम कक्ष क्रमांक ४४६ मध्ये ७५ व्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमीत्त विविध प्रजातीचे ७५ वृक्षांची लागवड करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर तिरंगा रॅली काढत उमरी पोतदार येथे समीती चौक चे मान्यवरांचे हस्ते उद्दघाटन करण्यात आले . उत्कृष्ठ कामे केल्याबाबत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्याचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले . वनमजुर मनोज उपरे या वनमजुराचे अकाली निधनानंतर पत्नीला आर्थिक मदत देण्यात आली
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी क्षेत्र सहायक अब्बास पठाण,वनरक्षक पी बी धांडे,आर बी बतलवार,कुमारी पी ई शेडमाके,कुमारी जे बी अटेल,तथा सर्व संयुक्त वन व्यवस्थापन समिती पदाधिकारी सहकार्य केले