ब्रेकिंग न्यूज…..गुरख्याला वाघाने पकडले ; गुराखी ठार

61

 

गावाजवळ आपले बैल घेवुन राखत असलेल्या गुराखीवर काल दि.13 ला सायंकाळी च्या सुमारास हल्ला करून त्या गुराखी ला वाघाने उचलून नेले.शोधा शोध केली असता त्याचा आज मृतदेह च मिळालेला आहे.त्यामुळे गावकऱ्यांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

चिकमारा येथील रामदास डुकरू नैताम वय 66 वर्ष हे नित्य नियमाने रोजच जनावरे चरायला नेतात त्याच प्रमाणे आज ही ते जनावरे चारत असतांना या परिसरात येक मोठा वाघ येवून रामदास नैताम ला उचलून नेला.वाघाने नेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वनविभागाला माहिती देण्यात आली व त्याचा शोध सुरू झाला.

 

काल रात्रौ झाली म्हणून आज सकाळ पासून शोध कार्याला सुरुवात केली असता काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला.
वनविभागाने पंचनामा केलेला असून वाघाच्या या रोजच्या दहशतीने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.