Home
HomeBreaking Newsचंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो ची उभ्या ट्रक धडक 4 ठार

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो ची उभ्या ट्रक धडक 4 ठार

 

सावली(सूरज बोम्मावार)
चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे मध्यरात्री च्या सुमारास बोलेरो ने प्रवास करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने त्यात 4 जण जागीच ठार तर 1 जण जखमी झाला आहे.

गडचिरोली येथील प्रसिद्ध डिजे वादक पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथीलअनुप ताडूलवार या आपल्या मित्रा सोबत चंद्रपूर येथे डिजे च्या काही साहित्य खरेदी साठी बोलेरो गाडी क्रमांक Mh 33 A 5157 ने गेलेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत अनुप ची पत्नी व साळा ही सोबत होता.

साहीत्य खरेदी करून परत गावाकडे येत असतानाच सावली तालुक्यातील किसानगर येथे मुख्यमार्गावर गाय बसलेली होती तिला वाचविण्यासाठी कट मारत असताना स्टेरिंग राळ तुटला आणि गाडी ही त्या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार धडक दिली.

अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला.त्यानंतर किसानगर व व्याहड खुर्द येथील काही सावली पोलिसांना माहिती दिली.सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे घटनास्थळी दाखल होत तेथील स्थानिकांची मदत घेत त्या अपघात ग्रस्ताना बाहेर काढले.व तेथील मृतकाना व जखमी ला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.

या अपघातात पंकज किशोर बागडे वय 26 रा.गडचिरोली,
अनुप रमेश ताडूलवार वय 35 वर्ष रा.विहीरगाव ता.सावली,
महेश्ववरी अनुप ताडूलवार वय 24 वर्ष रा.विहीरगाव,मनोज अजय तीर्थगिरीवार वय 29 रा.ताडगाव ता.भामरागड जिल्हा गडचिरोली यांचा मृत्यू झाला तर सुरेंद्र हरेंद्र मसराम वय 23 वर्ष रा.चिखली ता.सावली जिल्हा चंद्रपूर हे जखमी झालेले आहे.अपघाताचा तपास सावली पोलीस करीत आहे.

या अपघातात मृत्यू पावलेले गडचिरोली येथील डिजे संघटना चे अध्यक्ष पंकज बागडे चा मृत्यू झाला. पंकज डिजे म्हणून प्रसिद्ध आहे.तर विहीरगाव येथील माजी सरपंच ताडूलवार यांचा मुलगा व सून या दोघांचा अपघातात मृत्यू झाला तर अनुप चा साळा मनोज ही मरण पावला.या सर्वांच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !