मी भारताचा नागरिक….अजय राऊत यांची प्रसिद्ध कविता

39

मी भारताचा नागरिक
तिरंगा आहे आमुची शान
भारतीय संस्कृती महान
असा माझा भारत देश महान ll1ll

जाज्वल्य देशाचा अभिमान
माझ्या तिरंग्याची आहे शान
भारताचे संविधान स्वाभिमान
असा माझा भारत देश महान ll2ll

तिरंग्याची जपावी शान
जवानांचा करा सन्मान
त्यांचाच खरा अभिमान
असा माझा भारत देश महान ll3ll

सर्व जाती धर्म एक समान
याचाच वाटतो मला अभिमान
विकला नाही हो स्वाभिमान
असा माझा भारत देश महान ll4ll

देशासाठी देतो बलिदान
तोच खरा आहे जवान
देशासाठी त्याचा जातो प्राण
असा माझा भारत देश महान ll5ll

माझा देश कृषिप्रधान
जनमनाचे भान ठेवून
सदैव रहावी उंच मान
असा माझा भारत देश महान ll6ll

✍🏻रचना -अजय (गणेश)राऊत, कवठी