
तालुक्यातील हिरापुर येथे शेतावर काम करण्यासाठी गेलेला शेतकरी हा बैल धूत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला व त्या शेतकऱ्याला ठार करून शिकारी साठी उचलून नेल्याची घटना हिरापूर येथे घडलेली आहे.

भक्तदास श्रीरंग झरकर ४४ वर्ष असे मृतकाचे नाव असून तो हिरापुर येथील रहिवाशी होता. दिवस धान पिक रोवनीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारा सह शेतात काम करताना दिसतात या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात.
आज भक्तदास झरकर आणि त्याचे दोन साथी वसंत पिपरखेड़े आणि रजत राउत असे तीन शेतकरी गावातील शेतकरी सुरेश भिसे याच्या शेतात रोजीने आवत्याला बाशी मारन्यासाठी गेले होते.
बाशीचे काम पूर्ण झाल्यानंतर बैलाना चारन्यासाठी किसाननगर शेत शिवारा लागत कोंडेखल मायनर लोडि पुलाजवळ बैल चारत असताना दोन मोठे वाघ परिसरात दबा धरून बसलेले होते.परिणामी वाघाला पाहुन बैल चवताळले त्यामुळे शेती कामावर बैल चारणारे तिन्ही शेतकरी झुडपात लपुन बसले असता वाघाने हल्ला करुण झरकर ला फरकळत नेले उर्वरित लोकांनी आरडाओरड केलि असता वाघाने घटनास्थळावरुण पळ काढला.
वाघाच्या झालेल्या हल्यात मात्र भक्तदास याने आपला जीव गमविला. घटणेची माहिती होताच सावली वनपरीक्षेत्राचे अधिकारी कार्यालया चे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहे.
मृतकाच्या उच्च स्तरीय तपासणी पुढील कार्यवाही सुरु आहे मृतका च्या पाश्च्यात पत्नी एक मुलगा मुलगी असा आप्त परिवार असून मृतक हे हीरापुर येथील सामाजिक कार्यकर्ते यांचे मोठे भाऊ आहे त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे त्यामुळे या भागात वन्य जीवांची मोठी दहशत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
