विरुर पोलिसांचे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत झेंडा रॅली व विविध स्पर्धा

128
  • विरुर स्टेशन(तिरुपती नल्लाला)-
    आज दिनांक 10 आगस्ट रोजी विरुर पोलीस स्टेशन , शांतता कमेटी विरूर व महिला दक्षता समिती यांच्या संयुक्तपणे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत सकाळी दरम्यान ७५ सौ मीटर चालण्याची स्पर्धा घेण्यात आली त्यानंतर हरघर झेंडा अभियान अंर्तगत तिरंगा रॅली काढण्यात आली
    या रॅलीमध्ये स्थानिक इंदिरा महाविद्यालय व गुरूनानक शाळा विरूर ,शिवाजी महाविद्यालय राजुरा चे शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांचा रॅलीत सहभाग होता . रॅलीदरम्यान शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील विद्यार्थी कडुन राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती व स्वच्छता बाबत पथनाटय घेवून जनजागृती करण्यात आली .
    पुरूष व महीला करीता ७५ सौ मीटर वॉकीथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत ५० वर्षीय पुरूष गटातील विजेता तसेच महीला गटात मारोती झींगरू प्रथम क्रमांक श्वेता रविंद्र गोहणे विरूर व्दितीय क्रमांक – रत्नमाला मारोती उपरे तृतीय क्रमांक – वैष्णवी विठोबा खोबरे यांनी पटकविला तसेच ‘ स्वातंत्र्यांची ७५ वर्ष या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली . विविध वयोगटातील २०० निंबध प्राप्त झाले होते . त्यामध्ये प्रथम क्रमांक तेजस्विनी नामदेव बोटरे , . शिवाजी आश्रम शाळा , सुब्बई , व्दितीय क्रमांक तृष्टी रामा वाघाडे चिंचोली , तृतीय क्रमांक कनिका इसरू कोटनाके जि.प. शाळा सोंडो यांनी पटकविला त्यांना रोख बक्षिसे , सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले . पोलीस स्टेशन विरूर हद्दीतील ‘ पोलीस पाटील उत्कृष्ठ कामगीरी ‘ करीता चिंचोली गावाचे पोलीस पाटील संतोष नेहारे यांना सन्मानचिनह , शाल श्रीफळ देवून पुरस्कृत करण्यात
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा महाविद्यालय मधील शिक्षक,विद्यार्थी,महिला दक्षता समिती पदाधिकारी ,शांतता समिती विरुर आणि विरुर पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण आणि सर्व पोलीस कर्मचाऱयांनी सहकार्य केले