रेल्वेच्या धडकेत वाघ ठार * बल्हारशाह ते काझीपेठ रेल्वे मार्गातील चनाखा जंगलातील घटना

136

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
बल्हारशाह ते काझीपेठ या मध्य रेल्वेच्या मार्गातील चनाखा ते विहिरगाव दरम्यान रेल्वेच्या धडकेत वाघ ठार झाल्याची घटना आज दिनांक 10 आगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे
रेल्वे विभागाचा गँगमन नेहमीप्रमाणे रेल्वे ट्रक तपासणी करीत जात असताना चनाखा ते विहिरगाव दरम्यान कक्ष क्रमांक 160 मध्ये रेल्वे रुळालगत वाघ रेल्वेने ठार झाल्याचे आढळून आले लगेच त्यांनी रेल्वे स्टेशन प्रमुखाना याची माहिती दिली तसेच राजुरा वन कार्यालयात माहिती दिली माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड ,क्षेत्र सहायक नरेंद्र देशकर,आणि वनरक्षक संजय जाधव,वनमजुर,सह मोक्यावर जाऊन पंचनामा केला आणि वरिष्ठ वणाधिकार्याना याची माहिती देऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांनाही घटनास्थळी बोलवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे
या मध्य रेल्वे च्या मार्गात आतापर्यत वाघ,अस्वल,चितळ हे वन्यप्राणी ठार झाले आहेत या दृष्टिकोणातून या मार्गाचे बाजूने संरक्षण जाळी लावण्याची मागणी वन्यजीव प्रेमी संघटनेने केली आहे