सावली चे दोन सुपुत्र MS साठी USA ला रवाना…

139

 

#######################

सावली येथील प्रतिष्ठित नागरिक कै. श्री प्रभाकरजी बेजगमवार यांचे नातू आणि राजू बेजगमवार यांचे चिरंजीव कुमार प्रतीक बेजगमवार आज पुढील शिक्षणासाठी अमेरिका येथील शिकागो युनिव्हर्सिटी (USA) येथे M.S. साठी आज मुंबई येथून रवाना झाले.

तसेच कै. बाबुरावजी ताटकोंडावार यांचे नातू व संजय ताटकोंडावार यांचे चिरंजीव कुमार श्रेयस ताटकोंडावार दिनांक 4 ऑगस्ट 22 ला पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथील शिकागो युनिव्हर्सिटी (USA) येथे M.S. साठी मुंबई येथून रवाना झाले.


आपल्या शहरातील दोन युवक सातासमुद्रापार उच्च शिक्षणासाठी गेल्यामुळे सावली वासीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. सर्व कुटुंबीयांचे व दोघांचेही सावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.