नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शपथविधी चा सावलीत भाजपाने केला आनंदोत्सव साजरा

44

 

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट पदी वर्णी लागली व राजभवनात शपथविधी पार पडला. त्यानिमित्य सावली भाजपातर्फे बस स्थानक परिसरात फटक्यांची आतिषबाजी करून भाजपा जिंदाबाद व भारत माता की जय घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सुधीर मुनगंटीवार यांची पुनश्च कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने चंद्रपूर जिल्ह्याला मान मिळाला आहे.

मागील अडीच वर्षापासून सावली तालुका हा विकासापासून कोसो दूर होता. आता सुधीरभाऊ यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल व रखडलेली विकासकामे येणाऱ्या वर्षात पूर्ण होतील. असे प्रतिपादन भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते देवराव मुद्दमवार, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगडपल्लीवार, योगिता डबले, मनीषा चीमुरकर, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, तालुका महामंत्री दिलीप ठिकरे, नगरसेवक तथा जिल्हा महिला उपाध्यक्ष नीलिमा सूरमवार, नगरसेवक शारदा गुरनुले, तालुका महिला उपाध्यक्ष प्रतिभा बोभाटे, शोभा बाबनवाडे, मोतीराम चिमूरकर, तुकाराम ठिकरे,

माजी उपसभापती रवी बोल्लीवार, शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, महिला शहराध्यक्ष गुड्डी सहारे, गौरव संतोषवार, राकेश विरमलवार, निखिल सूरमवार, सचिन तंगडपल्लीवार, राहुल लोडेलीवार, किशोर वाकुडकर, पत्रू परचाके, ढीवरु उराडे, प्रदीप चलाख, अंकुश भोपये, घनश्याम सूत्रपवार, रोशन अन्सारी, प्रसाद जक्कुलवार, सिंधुताई मराठे, मीना मोहुर्ले, मयूर व्यास, आनंद खजांची, आदर्श कुडकावार, किशोर गुरनुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.