गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा करणारे स्कारपियो हरणघाट फाट्यावर पकडले

79

 

गडचिरोली जिल्यात दारू बंदी असतांना ही अवैध रित्या दारू जात असल्याची गुप्त माहिती सावली पोलिसांना मिळताच हरणघाट वर सापडा रचून सावली पोलिसांनी स्कारपियो पकडली त्यात दोन आरोपींना अटक करून त्यांच्या कडून 8 लाख 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

दिनांक ०८/०८/२०२२ रोजीचे रात्री अं. २०:०० वा दरम्यान सावली पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, मुल येथून चामोर्शी जि गडचिरोली कडे हरणघाट मार्गे एका पांढऱ्या रंगाच्या महींद्रा स्कॉर्पिओ चारचाकी गाडी क्र एम.एच. ३१ सी.पी. ३८२६ ने दारु वाहतुक होणार आहे. अशी खबर मिळाल्याने तात्काळ मुल ते चामोर्शी मार्गावरील हरणघाट बस स्टॉप जवळ नाकाबंदी केली असता मुल वरून चामोर्शी दिशेकडे येणारी नमूद वर्णनाची महींद्रा स्कॉर्पिओ चारचाकी गाडी क्र एम. एच. ३१ सी. पी. ३८२६ ला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये खालील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला.

रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारू प्रत्येकी ९० एम. एल. च्या सिलबंद बॉटलनुसार एकूण ४० बॉक्स किं. अंदाजे १,६०,०००/- रू. व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली जुनी वापरती एक पांढऱ्या रंगाची स्कार्पीओ चारचाकी वाहन क्र एम. एच. ३१ सी.पी. ३८२६ किं. अंदाजे ७,००,०००/- रू. आरोपी यांच्या ताब्यातील दोन मोबाईल किं. ११,०००/- रू. असा एकुण ८,७१,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यात आरोपी नामे प्रतीक प्रल्हाद सातपुते वय २४ वर्ष रा. रामपुर ता. चामोर्शी जि. गडचिरोली, प्रेम संतोष आत्राम वय २२ वर्ष रा. वार्ड नं. ६ आंबेडकर वार्ड चामोर्शि ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांचेवर कलम
६५(अ),८३ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात पोहेका दर्शन लाटकर, नापोका मोहन दासरवार, विशाल दुर्योधन, पो. का चंद्रशेखर गंपलवार, धिरज पिदुरकर यांनी केली आहे.

सदर अवैध दारू कुठल्या दुकानातून आणली गेली याची चौकशी करून त्या दारू दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.