
श्री गुरु प.पू. संत श्री ब्रह्मकालीन कार्तिक स्वामी महाराज यांचे कृपा आशीर्वादाने व श्री हनुमानजी प्रभू यांचे कृपेने दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोज मंगळवार ला श्रावण शु.प.१२ला मुरलीधर महाराज यांचे अवतरण दिवस कार्यक्रम श्री मुरलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने हरणघाट येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमात सकाळी 10 वाजेपासून भक्तिमय संगीत कार्यक्रम सुरुवात करणार आहे.दुपारी साडेबारा वाजता संत मुरलीधर महाराज यांचा तीलक पूजन होणार असून दुपारी एक वाजता भव्य महाप्रसादाने समारोप होणार आहे.
या कार्यक्रमात विविध राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्तगणांची सुद्धा उपस्थिती लाभणार आहे तरी या कार्यक्रमाला परमपूज्य संत मुरलीधर महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व भक्त जणांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
