त्या रेल्वे प्रवाश्याचा मृत्यूदेह विहिरगाव जंगलात आढळला

78

राजुरा,(तिरुपती नल्लाला)-
सिकंदराबाद ते बडनेरा रेल्वे प्रवास दरम्यान बेपत्ता झालेल्या कुशल खत्री यांचा मृत्यूदेह राजुरा तालुक्यातील विहिरगाव ते विरुर दरम्यान रेल्वे लाईन लगत आढळून आला आहे हा अपघात, आत्महत्या की हत्या हे मात्र समजू शकले नाही
3 आगस्ट रोजी सिकंदराबाद वरून बडनेरा ला पत्नी खुशबू सह रेल्वेने प्रवास करणारे कुशल सुरेंद्र खत्री हे विरुर रेल्वे स्टेशन पासून बेपत्ता झाल्याची तक्रार बल्हारशाह रेल्वे पोलिसात 3 आगस्ट रोजी खुशबू यांनी सकाळी दिली होती त्यानुसार शोध सुरू होता दरम्यान आज 7 आगस्ट रोजी सकाळीच रेल्वे गँगमन ला विहिरगाव ते विरुर दरम्यान रेल्वे लाईन बाजूला प्रेत आढळून आले , याची विरुर पोलिसात व रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच पोलीस ,रेल्वे पोलीस व वनविभागाचेही कर्मचारी मोक्यावर जाऊन खातरजमा केली आणि पुढील कार्यवाही सुरू केली आहे मोका तपासणी वरून त्या बेपत्ता कुशल खत्री याचाच मृत्यूदेह असल्याचे स्पष्ट झाले लगेच त्याचे नातलगास बोलावून खात्री करवून घेतली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनात विरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण,हवालदार दिवाकर पवार,माणिक वागदरकर,विजय मुंडे,सुरेंद्र काळे आदी करीत आहे