
विरुर स्टेशन(संतोष मडपूवार)-
तालुक्यातील डोंगरगाव तलावात पोहण्यासाठी गेलेल्या टेम्भुरवाही येथील रुपेश कुळसंगे याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला तर मनोज बावणे याचा थोडक्यात जीव वाचला परंतु गँभिर स्थिती असल्याने राजुरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

टेंभुरवाही येथील काही मित्र विरुर जवळील डोंगरगाव येथील धरण तलावात ओव्हरफ्लो पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते काही मित्र खोल पाण्यात पोहू लागले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने मनोज बावणे, रुपेश कुळसंगे दोघेही डुबकी घेऊ लागले परंतु यात रुपेश खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला तर मनोज बावणे हा कसाबसा पाण्याबाहेर आल्याने बचावला परंतु नाकतोडातून पाणी गेल्याने गँभिर अवस्था झाली त्यामुळे त्याला राजुरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
मृतक रुपेश कुळसंगे हे एस टी महामंडळात सावनेर आगारात चालक म्हणून कार्यरत आहे तो नुकताच स्वगावी सुट्टीवर आला होता.दरवर्षी या तलावावर हौशी लोक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो पाण्यात आस्वाद घेण्यासाठी येत असतात आणि दरवर्षी अनुचित दुर्दैवी घटना घडत आहे असे असतानाही सबंदीत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे