सर्पमित्रांनी दिले नाग आणि नागीण ला पकडून केले निसर्गमुक्त

41

 

हरांबा (मोहीत मुद्दमवार) सावली तालुक्यातील हरांबा गावातील आरण्याजी भोयर यांच्या घरी आज सायंकाळच्या सुमारात दोन साप निघाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण त्या सापाणा मारण्याचा दुष्ट विचार न येता सापाला जिवंत पकडण्यासाठी संबंधित घर मालकांनी सर्प मित्राला बोलावले.

खेड्यात नाग सापाला देव मानले जाते व पूजा ही केली जाते. साप हा पर्यावरण संतुलन राखणारा एक घटक आहे. त्याचप्रमाणे अन्नसाखळीतील महत्वाचा भाग असल्यामुळे शासन साप बचाव मोहीम राबवत असते.

टायगर वन्यजीव संस्था सावली चे सद्स्य चिंतामण तरारे हे आकाश बोबाटे, विकास पोटे,यांच्या समवेत सापाला पकडले मात्र त्या ठिकाणी दोन साप असल्याचे दिसले त्यात नाग नागीण असे दोन मोठे साप ला पकडले. त्यानंतर सर्पमित्रांनी या सापांची वनविभागाला माहिती देऊन निसर्गमुक्त केले. यावेळी सर्व गावकऱ्यांनी सर्पमित्राचे आभार मानले.