सावली शहरात बिबट घुसला… बिबट्याने केला शेळ्यांचा कोठ्यावर हल्ला

59

 

सावली शहरातील वार्ड क्रमांक 16 मधील सुरेश गुंडूरुकवार यांच्या घराच्या बाजूला असलेल्या शेळ्यांच्या कोठ्यावर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या ठार करून एक शेळी पळवून नेली आहे.ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून आज पहाटे उघडकीस आली.

शेळ्याना नित्यनियमाने आज कोठ्यातून बांधण्यासाठी बाहेर काढत असताना तीन शेळ्या कमी आढळले.व एक शेळी ठार झाल्याची दिसली त्यानंतर त्या परिसरात बिबट च्या पायाचे ठसे मोठ्या प्रमाणात दिसले तसेच लहान बिबट चे ठसे दिसले म्हणजे बिबट हे पिल्लांना सोबत आली असावी अशी पायाचा ठसे वरून निर्दशनास येत आहे.

त्यानंतर आजूबाजूला शोध घेतले असता एक शेळी ठार झाल्याचे दिसले तर एक शेळी ला नेल्याचे दिसत आहे.म्हणजे तीन शेळ्या या बिबट ने फस्त केल्याचे दिसते.

बिबट हा मादी व मोठा असल्याचे कळते कारण सावली जवळ अनेकांनी या बिबट ला पाहिले असून येन गावात येऊन बिबट जर हल्ला करीत असेल तर ही धोक्याची घंटा आहे.

सदर घटनेची माहिती गुंडूकवार परिवार ने नगरसेवक सतीश बोम्मावार यांना दिली त्यानीं लगेच वनविभागाला माहिती दिली व वनरक्षक विश्वास चौधरी हे घटना स्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलेला आहे.या गरीब परिवार ला जास्तीत जास्त मदत देण्याची मागणी नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी केली आहे.