ग्रामपंचायत च्या दुर्लक्षित कारभारात देवाडात कालरा ची लागण ?

35

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
राजुरा तालुक्यातील देवाडा,सिद्धेश्वर येथे मागील पाच दिवसापासून कालरा अतिसार ची लागण झालेली असून सुमारे 70 पेक्षा अधिक रुग्णावर उपचार सुरू आहे तर खाजगी रुग्णालय मार्फत उपचार केलेल्या काही रुगणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे परंतु गावातील नलयोजनेचे पिण्याचे पाणी दूषित असल्याने तसेच गावात घाणीचे साम्राज्य पसरले असतानाही ग्रामपंचायत च्या दुर्लक्षितपणामुळे ही लागण पसरल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे गावातील नलयोजनेचे पाईप वाल च्या खड्ड्यात नालीचे घाण पाणी जमा झाले तेच पाणी पाईप द्वारे लोकांपर्यत मिळत आहे शिवाय ग्रामपंचायतनी या रोगाची लागण होत पर्यत ब्लिचिंग पावडर सुद्धा टाकलेले नाही गावातील नालीचे साफसफाई केलेली नाही तसेच फवारणी सुद्धा केली नाही असा आरोपी गावकर्यानी केला आहे.

दरम्यान माहिती मिळताच आज जिल्हा परिषद चे माजी सभापती सुनील उरकुडे यांनी देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेऊन रुग्णाशी विचारपूस केली तसेच वैद्यकीय अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकार्याशी चर्चा केली यावेळी ग्रामसेवकच मुक्यालयी राहत नसल्याचे ग्रामस्थानी सांगितले
तर आरोग्य विभाग ही लागण आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत असून आज तारखेत बरेच रुग्ण कमी झालेले असल्याचे डाँक्टर विपीन कुमार यांनी सांगितले