कृषी परवाना नुतनीकरणसाठी 10 हजाराची लाच घेताना एका खाजगी इसमास कृषी सहायक लाचलुचपत विभागाचे जाळ्यात

55

राजुरा,(संतोष कुंदोजवार)-
कृषी सहायकासह एका खाजगी व्यक्तीला कृषी परवाना नूतनीकरण करण्यासाठी अर्जादाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक करण्यात आली आहे
तक्रारदार हे मौजा पोवनी येथील रहीवासी असुन तकारदार यांचे आपले सरकार पोर्टल या प्रणालीवर जुने ०४ कृषी केंद्र विक्री परवाने नूतनीकरण करुन, ०१ नविन परवाना काढुन व सर्व कृषी केंद्र परवाने स्थालांतर करुन देण्याच्या कामाकरीता कृषी अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथील कृषी सहायक जया विजय व्यवहारे, यांनी दिनाक. ०४ आगस्ट रोजी तक्रारदाराकडे १०,०००/-रु. ची मागणी केल्याच्या पडताळणी कार्यवाहीवरुन आज दिनांक ०५ आगस्ट रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान जया विजय व्यवहारे यांनी तक्रारदाराकडे १०,०००/-रुपये लाचेची मागणी करुन राजुरा येथील वैभव विजय धोटे या खाजगी इसम यांचे मार्फतीने जया विजय व्यवहारे, यांचेकरीता लाचरक्कम म्हणुन स्विकारल्याने वैभव धोटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले तसेच जया विजय व्यवहारे, यांना कृषी अधिक्षक, कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपुर या कार्यालयामधुन ताब्यात घेण्यात आलेले आहे. पुढील तपास कार्यवाही सुरु आहे..
सदरची कार्यवाही ही लाचलुचपत विभागाचे पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक नागपुर राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक. मधुकर गिते, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, .चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे, पो.नि. जितेंद्र गुरुनुले, तसेच कार्यालयीन कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक. रमेश दुपारे नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकॉ. रोशन चांदेकर, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.