सावली तालुका शिवसेना तालुका प्रमुख पदी लीलाधर गिरीधर चुधरी यांची नियुक्ती

100

 

हिंदूहृयुदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आदेशाने शिवसेना नेते खासदार गजाननजी किर्तीकर यांच्या सुचनेनुसार व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, विधानसभा संपर्कप्रमुख अशोक सकपाळ यांच्या सहमताने
सावली तालुकाप्रमुख [ प्रभारी ] या पदावर सावली तालुक्यातील युवा नेतृत्व तथा ओबीसी युवा चेहरा लीलाधर गिरीधर चुधरी यांची नियुक्ती करीत असल्याचे नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी दिले आहे.

पक्षाचा प्रचार व प्रसार जोमाने करण्यासाठी व त्याकरीता सर्वतोपरी मदत करणार असल्याचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी म्हटले आहे.

पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत च्या सर्व निवडणूकीत जोमाने कार्य करण्यासाठी पक्ष संघटना ची मजबूत बांधणी साठी आपल्या पाठीशी ठाम आहे असेही जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी लीलाधर चुधरी यांना शब्द दिला आहे.

नियुक्तीचे स्वागत…💐💐
लीलाधर गिरीधर चुधरी रा.कसरगाव ता.सावली यांची सावली तालुका शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सावली तालुक्यातील तमाम शिवसैनिकांनी आंनद व्यक्त केला आहे.तसेच त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.