
सावली शहरातील चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील शेतकरी सहकारी राईस मिल सोसायटी दुकान चाळी समोर विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू झाल्याची घटना (दि 4) च्या रात्रौ च्या सुमारास घडली.सदर घटना लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला मात्र महावितरणच्या विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

सावली शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात आले. महामार्गाच्या बांधकामासाठी शहरात भूमिगत वीज वाहिनी चे काम करण्यात आले. सदर भूमिगत वीजवाहिनीचे काम करीत असताना संबंधित महावितरण विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने अनेक भागात भूमिगत वीज वाहिनी ही नालीतील पाण्याच्या संपर्कात आली आहे.
तर अनेक पोल व विद्युत पेटीला करंट असल्याचे शहरवासीय कडून बोलल्या जात आहे.
शेतकरी राईस मिल या संस्थेने दुकान चाळीचे बांधकाम केले. त्या दुकानांमध्ये अनेक किरायेदार आपला व्यवसाय सुरू केला आहे.या चाळी समोरच महावितरणचा पोल असून पावसामुळे लहान झाडे उगवली आहेत. रात्रीच्या सुमारास झाडाची पाने खाण्यासाठी गाय ही गेली असता विजेचा जोरदार धक्का लागून गायीचा तडफडून मृत्यू झाला.
सदर घटनेची माहीती महावितरण विभागाला देण्यात आली.त्या घटनास्थळी उपविभागीय महावितरण अभियंता खरकाडे हे आपल्या चमू सह पोहचले. व संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित करण्यात आले.व कामे करण्यात आली.
भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पाहिजे त्या प्रमाणात योग्य न झाल्याने शहरातील अनेक पोल व विद्युत पेटीवर करंट येत आहे. त्यामुळे मानवाच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
त्यामुळे सावली शहरातील भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाकडे महावितरणचे अधिकारी हे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने या अधिकारीना दोषी ठरवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सावली करांनी केली आहे.
*बॉक्स*
आमच्या संस्थेच्या चाळी समोरील इलेक्ट्रिक पोलला करंट असल्याने गायीचा मृत्यू झाला. चाळीतील दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकास याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शहरातील भूमिगत विद्युत वाहिनी दुरुस्त करून सुरळीत करण्यात यावी.
*मोहन गाडेवार, अध्यक्ष शेतकरी राईस मिल सावली*
लिकेज करंट मुळे तेथील विद्युत पेटीमधील फ्युज जायला पाहिजे होता मात्र तो न गेल्याने विद्युत प्रवाह सुरू होता त्यामुळे तिथे संपर्कात येणाऱ्या एका गाईला जोरदार विद्युत लागल्याने त्यात गायीच्या मृत्यू झालेला आहे सदर घटना घडताच महावितरण ची संपूर्ण समूह घटनास्थळी हजर राहून संबंधित दुरुस्ती करून घेतली-
*शशिकांत कुकडे, शाखा अभियंता महावितरण विभाग सावली*