विरखल मध्ये वाघ व बिबट ची दहशत;रात्रौ 8 ला गावात आल्याने भीतीचे वातावरण

74

 

 

सावली तालुक्यातील विरखल येथे दोन दिवसाआड वाघ व बिबट चे दर्शन होत आहे आज पुन्हा रात्रौ गावाजवळ वाघाने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विरखल गाव जंगलाला लागून आहे.त्यामुळे अनेकदा येथील जनतेला वन्यप्राणी यांचा धोका नेहमी असतो.2 तारखेला पत्रुजी जुमनाके यांच्या घरी सायंकाळी 8 च्या सुमारास बिबट आला.

आज दिनांक 4 ऑगस्ट ला भास्कर मारभते यांच्या रात्रौ 8 च्या दरम्यान वाघ हा दरवाज्यात आला.आरडाओरड केल्याने पळून गेला त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.सदर घटनेची माहिती वनरक्षक खुडे व यांना देण्यात आली.त्यांनी घटनास्थळी येऊन वाघाचे पगमार्क घेऊन वरिष्ठ अधिकारी यांना कळविले.

सद्या या रोजच्या बिबट व वाघाचा दर्शनाने नागरिक मात्र भयभीत झाले असून पिंजरे लावून बंदोबस्त करण्याची मागणी विरखल येथील युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते ईश्वर गंडाटे यांनी वनविभागाकडे केली आहे.