Home
HomeBreaking Newsमाजी आमदार उद्धवराव शिंगाडे यांचे निधन

माजी आमदार उद्धवराव शिंगाडे यांचे निधन

 

माजी आमदार उध्‍दवराव शिंगाडे यांच्‍या निधनाने सर्वसामान्‍य जनतेचा आवाज बुलंद करणारा लोकसेवक हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार

ब्रम्हपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार उद्धवराव शिंगाडे यांचे आज दिनांक 4 आगस्ट ला सायंकाळी 5 वाजता निधन झाले.त्यांच्या वर दिनांक 5 आगस्ट ला चिंचोली बूज येथील वैनगंगा नदीच्या काठावर दुपारी 12 वाजता करणार असल्याची माहिती आहे.त्यांच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

माजी आमदार उध्‍दवराव शिंगाडे यांच्‍या निधनाने सर्वसामान्‍य जनतेचा आवाज बुलंद करणारा लोकसेवक काळाच्‍या पडदयाआड गेल्‍याची शोक भावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

अतिशय साधी राहणी, सर्वसामान्‍य जनतेमध्‍ये त्‍यांच्‍या आपुलकीचा माणूस म्‍हणून मिसळणारा आमदार म्‍हणून उध्‍दवराव शिंगाडे यांनी लोकप्रियता मिळविली होती. आमदार म्‍हणून शेतक-यांच्‍या प्रश्‍नांसाठी, दीन, दुर्बल, शोषीतांच्‍या प्रश्‍नांसाठी आक्रमक होणारे उध्‍दवराव विधानसभेतील सहकारी म्‍हणून मी अनुभवले आहे. अतिशय गरीब शेतकरी कुटूंबात जन्‍माला आलेल्‍या उध्‍दवरावांनी मोठा संघर्ष करत आमदार म्‍हणून स्‍वतःला सिध्‍द केले. त्‍यांच्‍या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर या दुःखातुन सावरण्‍याचे बळ त्‍यांच्‍या कुटूंबियांना देवो व त्‍यांच्‍या पुण्‍यात्‍म्‍याला शांती प्रदान करो, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !