‘राहुल’ च्या मेल ची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

50

सावली तालुका होऊन अजूनही उद्योग विना तालुका आहे सावली तालुका हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून बेरोजगार युवकांची फौज या तालुक्यामध्ये आहे त्यामूळे युवक रोजगार मुख होण्यासाठी सावली तालुक्यात एमआयडीसी सुरू करावी अशी मागणी व्याहाड खुर्द येथील युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारे यांनी शासनाला इमेल द्वारे पत्र पाठविले तसेच महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही इमेल द्वारे पत्र पाठविले असता त्या पत्राला मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्वरित दखल घेत पुढील कारवाई साठी उद्योग विभाग ला पाठवीत आली आहे असे उत्तर मुख्यमंत्री कार्यालय कडून राहुल भंडारे यांना मिळाले आहे.

सावली तालुक्यात बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरिता आणि तालुक्यातील व्यावसायिकांचा व्यवसायाच्या दर्जा हा वाढला पाहिजे याकरिता सावली तालुक्यात एमआयडीसी ची जागा उपलब्ध करून एमआयडीसी सुरू करावी अशी मागणी सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द चे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारे यांनी केलेली होती.

या पत्राची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेली असून या भागाचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांना युवा स्वराज या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते भेटून त्यांच्या माध्यमातून हा विषय धसास लावणार असल्याचे युवा नेते राहुल भंडारे यांनी म्हटले आहे.

युवा नेता तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारे यांच्या पत्राची त्वरित दखल घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे युवा स्वराज या सामाजिक संस्थेने आभार मानले आहे.