सावली तालुक्यासाठी एमआयडीसी सुरू करा -युवा नेते राहुल भंडारे यांची मागणी

59

 

सावली तालुका होऊन अजूनही उद्योग विना तालुका आहे सावली तालुका हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून बेरोजगार युवकांची फौज या तालुक्यामध्ये आहे त्यामूळे युवक रोजगार मुख होण्यासाठी सावली तालुक्यात एम आय डी सी सुरू करावी अशी मागणी व्याहड खुर्द येथील युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारे यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासना कडे केली आहे.

पाणी उपलब्ध नाही म्हणून अनेक ठिकाणचे प्रकल्प बंद होतात तसेच अखेरची घरघर लागते मात्र सावली तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे आसोला मेंढा सिंचन प्रकल्पाचे पाणी तसेच वैनगंगा नदीचा पात्र ची सीमा ही मोठ्या प्रमाणात सावली तालुक्याला लागून असल्याने पाण्याची भरपूर सुविधा आहे.

सावली तालुक्यात बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरिता आणि तालुक्यातील व्यावसायिकांचा व्यवसायाच्या दर्जा हा वाढला पाहिजे याकरिता सावली तालुक्यात एमआयडीसी ची जागा उपलब्ध करून एमआयडीसी सुरू करावी अशी मागणी सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द चे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारे यांनी केलेली आहे.

राहुल भंडारे यांनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे सुद्धा मागणी केलेली आहे.त्या संदर्भात त्यांनी मागणी पत्र चे मेल केले आहे.