
सावली तालुका हा शेतीप्रधान तालुका म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अधिक प्रमाण असून तालुक्यातील शेतकरी शेतीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मागील काही दिवसात तालुक्यामध्ये नव्हे तर अख्या महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमाण राखला होता.

परंतु आता पावसाने उसंत घेतला असून शेतकऱ्यांचे रोवणी रखडल्या सारखे झाले व उन्हामुळे करपत चालले असून आता पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने असोला मेंढा प्रकल्पाचे नहराला पाणी सोडुन शेतकऱ्यांच्या पिकाला नवसंजीवनी देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे अ. गो. आठवले सह्याक अभियंता यांना निवेदनातून करण्यात आली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी तीन दिवसात नहरला पाणी सोडू असे आश्वासन दिले.
या वेळी भारतीय जनता पार्टी चे महामंत्री तथा नगरसेवक, सतीश बोम्मावार, भाजपा जेष्ठ नेते देवराव सावकार मुददमवार, रवि बोलीवार माजी उपसभापती प. स, जेष्ठ युवा नेते नामदेव भोयर, जेष्ठ युवा नेते किशोर वाकुडकर राकेश गोलेपल्लीवार ग्रा. प. सदस्य, निखील सुरमवार युवा नेता, प्रसाद जक्कुलवार हे उपस्तित होते