
चंद्रपूर जिल्हातील ग्रामपंचायत अंतर्गत संगणक परिचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या संगणक परीचालाकांचे मागील चार महिन्यांचे थकीत मानधन मिळाले नसल्याने आज जिल्हातील संगणक परिचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

गेल्या 12 वर्ष्यापासून आम्ही संगणक परिचालक ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रामाणिक पने आपली असर्व ऑनलाईन – ऑफलाईन कामे जबाबदारीने पूर्ण करीत आहो.तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा नियमित पने देत आहो या कामाचा मोबदला तुटपुंजे मानधन स्वरुपात मुळात असून सुधा मानधन हे नियमित न मिळता चार ते पाच महिने मानधनाची वाट पहावी लागते.अश्या प्रकारे नाहक त्रास संगणक परीचालाकांना होत आहे.
डिजिटल महाराष्ट्र इंडियाचा शिलेदार आज चार महिन्यापासून मानधना विना काम करत आहे.थकीत मानधनाचा बाबत जिल्हातील वरिष्ठ अधिकारी व तालुका वरिष्ठ अधिकारी यांना असता पी.एफ.एम. एस.व आर टी.सी जि.एस.झाले अनही या मुद्यावर बोलून उडवा उडवीचे उत्तरे नेहमीच देत असतात.थकीत मानधन बाबत दीड महिन्यापूर्वी जिल्हा प्रशाषण व कंपनी यांना निवेदन देण्यात आले होते.
तरी सुधा त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही व अद्यापही मानधन थकीत स्वरुपात आहे.चार महिन्याचे थकीत मानधन न झाल्याने आम्हा संगणक परीचालाकांचे कुटुंब खूप वाईट परिस्थितीतून जीवन जगात आहे. थकीत मानधन या समस्येमुळे भविष्यात जर कोणत्याही संगणक परीचालाकांने त्रासून जीवास हानी पोहचविल्यास यांचे सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील.
करिता जोपर्यंत मागील चार महिन्याचे थकीत मानधन एकत्रित पने होणार नाही तो पर्यंत नाईलाजास्तव चंद्रपूर जिल्हा संघटनेच्या वतीने दिनांक २५/७/२०२२ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
