
कवठी:- सावली तालुक्यातील हरणघाट- कवठी – उसेगाव- पारडी मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. डांबरीकरण अनेक ठिकठिकाणी उखडले असून, मार्गावर मोठ- मोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. मोठ्या खड्यात नेमके पाणी किती आहे हे लक्षात येत नाही. हेच खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

या परिसरातील नागरिकांना अनेक कामांसाठी सावली, गडचिरोली, मूल, चामोर्शी ला जाण- येणं करण्याकरिता हरणघाट- कवठी- उसेगाव- पारडी हे मार्ग कमी अंतराचे असल्याने या परिसरातील नागरिक नेहमी याच मार्गाने दळणवळण करतात. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उखडले असून दोन ते तीन फुटाचे जीवघेणे खड्डे मार्गावर पडले आहेत.
या रस्त्याला अनेक दिवसांपासून ओढ्याचे, नाला चे स्वरूप प्राप्त झाले असून हा रस्ता आहे कि, ओढा, नाला हेच कळेनासे झाले आहे, त्यामुळे वाहन चालकास आपले जीव मुठीत घेऊनच तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागतात.
या खड्यांमुळे अपघाताच्या घटनाही नेहमीच घडत आहेत. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुलर्क्ष होताना दिसून येत आहे. प्रशासनाने तातळीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे, मात्र बांधकाम प्रशासन गाढ झोपेत असल्याने वारंवार अपघातांची मालिका वाढतच चालली आहे, त्यामुळे या रस्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.
