पंचायत समिती च्या निवडणूक रिंगणात उतरणार- राहुल भंडारे

63

 

जनतेच्या सेवेत नेहमीच कार्य तत्परतेने पुढे असणारे युवा नेतृत्व ,व्याहड खुर्द येथील युवा स्वराज या सामाजिक संस्थेचा पदाधिकारी राहुल भंडारे यांनी पुढे होणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता व्याहड खुर्द या गणातून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी एस. न्यूज.नेटवर्क शी बोलतांना सांगीतले आहे.

मूळ निवासी केरोडा येथील मात्र व्याहड खुर्द येथे वडील डॉक्टर नानाजी विस्तारी भंडारे माजी पं. स. सदस्य पं. स सावली, आई ज्योती नानाजी भंडारे माजी ग्रा. पं. सदस्य व्याहाड खुर्द यांचे चिरंजीव असलेले राहुल यांचे B. com पर्यंत चे शिक्षन झालेले आहे. वडिलांची शिस्तप्रिय राजकारणी माणूस म्हणून त्यांची सावली तालुक्यात ओडख आहे.तसेच आई ज्योती या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. वडिलांच्या निवडणुकीपासून राजकीय क्षेत्रात पाऊल, राजकीय, तांत्रिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापनाचे सुसज्ञ अनुभव तसेच
युवा स्वराज बहुउद्देशीय संस्था व्याहाड खुर्द च्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रमांमध्ये प्रामुख्याने सहभाग असल्याने राहुल भंडारे यांची मोठी ओडख आहे.

त्यामुळे जनतेचे काम करण्याची त्यांची आवड लक्षात घेता ते यावेळी व्याहड खुर्द पंचायत समिती गणमधून सर्वसाधारण उमेदवार असल्याने ते निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे.ते अपक्ष राहणार की कोणत्या राजकीय पक्षातून हे मात्र त्यांनी पत्ते उघड केले नसल्याने त्यांच्या या घोषणेने मात्र युवा वर्गात आंनद संचारला आहे.