
सावली तालुक्यातील सामदा बूज येथील सरपंच शुभांगी प्रशांत मडावी यांना दिनांक 30/07/2022 ला रात्रोच्या सुमारास 7.30 वाजता गावातील प्रफुल सुरेश मडावी सामदा बूज यांनी सरपंच यांच्या घरी जाऊन त्यांची अश्लील शिविगाळ व ओढणी खेचून गळा दाबून घरा बाहेर काढून मारण्याचा प्रयंत केला.

सदर सरपंच शुभांगी प्रशांत मडावी यांच्या घरी पुरूश्यांच्या गैरहजरीत हा प्रकरण घडलेला होता. गावातील सरपंच या नात्याने प्रथम नागरिकावर च असे प्रकरण घड़त असतील तर या गोष्टिची गाभिर्यने दखल घेउन कठोर कारवाई करावी अन स्त्री जातीला न्याय द्यावा.
अशी मागणी सरपंच शुभांगी मडावी यांनी केली आहे.या संदर्भात सावली पोलिसात तक्रार करण्यात आलेली असून पोलिसांनी 294,504,506 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.याप्रकरणी आरोपी ला अटक करून सुटका झालेली आहे.पुढील तपास सुरू आहे.
