Home
Homeमहाराष्ट्रडॉ. किलनाके यांच्या घरासमोरून दुभाजक कट करून देण्यात यावे

डॉ. किलनाके यांच्या घरासमोरून दुभाजक कट करून देण्यात यावे

 

मागील वर्षी गडचिरोली- चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटिकरण करण्यात आले. त्यानंतर लगेच सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत दुभाजक व स्ट्रीट लाईटचे कामे करण्यात आले. त्यामुळे गडचिरोली शहराच्या सौंदर्यकरणात मोठ्या प्रमाणात भर पडली यात तिर मात्र शंका नाही. परंतु डॉ. किलनाके यांच्या हॉस्पिटल समोरून दुभाजक कट केले नसल्याने नागरिकांना येणे जाणे करणे करीता मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे गणेश नगर, अयोध्या नगर, शिक्षक कॉलनी, परिसरातील याचा नाहक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. डॉ. किलनाके हॉस्पिटलच्या मागे हजारो नागरिक वास्तव्यास असतात. त्या ठीकानी अनंता हॉस्पिटल सुद्धा आहे. स्वामी विवेकानंद शाळा सुद्धा आहे. तसेच बजाज शोरूनच्या मागील बाजूस सुद्धा शिक्षक कॉलनी परिसरात हजारो नागरिक वास्तव्य करतात. परंतु नागरिकांना डॉ. किलनाके यांच्या दवाखान्याजवळ दुभाजक येणे जाणे करणे करीत दुभाजक कट (मेडियन गॅप) करून देण्यात यावे. जेणेकरून या प्रभागातील नागरिकांना जाणे येणे करण्यास त्रास होणार नाही.

त्याठिकावरून सध्यास्थितीत 600 मिटर अंतरापर्यत दुभाजक कट नसल्यामुळे नागरिकांना वाहने विरुद्ध दिशेने न्यावे लागते त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आणि रोजच अपघात होत आहेत.तसेच एसटी महामंडळ च्या बसेस सुद्धा विरुद्ध दिशेने पिपरे पेट्रोल पपंवर डिझेल भरायला येत असतात त्यामुळे नागरिकांना गाड्या काढण्यास मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी डॉ. किलनाके हॉस्पिटल समोरून दुभाजक कट करून देण्यात यावे जेणे करून दोन्ही साईडच्या नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर होईल आणि अपघाताचे प्रमाण कमी होतील.
अन्यथा युवक काँग्रेस कडून आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. आणि लवकरात येथील दुभाजक कट करून देण्यात यावे. ही नम्र विनंती.

त्यावेळी निवेदन देताना जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर, विश्वनाथ तलांडे, वासुदेव भोयर, मनोज इरकुलवार, मनीषा ढवळे, शरद गिरेपुंजे ,साई सिल्लमवार, बाळू मडावी, रुपेश टिकले, दिलीप बिट्टूरवार, अमित बिट्टूलवार यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !