गडचिरोली आगारातील मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करा – अविनाश पाल यांची मागणी

33

 

सावली :-मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगारातील बस सेवा हि ग्रामीण भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू होती.पण कोरोनाच्या काळात बंद करण्यात आली परंतू आता सद्या कोरोनाचे निर्बंध नाहीत व नियमितपणे सगळीकडे शाळा कॉलेजेस सुरु झालेले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्या येण्याची अडचण निर्माण होत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व इतर शासकीय कामासाठी तहसिल ठिकाणी जाऊन अनेक कामे करावी लागतात. त्यामुळे सोनापूर सामदा व्याहाड (बुज), कोडेखल, केरोडा, घोडेवाही, हे गाव मुख्य रसत्यापासून दुर असल्याने या ठिकाणी जाण्यायेण्याकरीता वाहतुक व्यवस्था नाही. त्याकरीता सदर गडचिरोली, सोनापूर, व्याहाड (बुज.) बसस्टेंट ते व्याहाड खुर्द ते केरोडा, कोडेंखल, घोडेवाही वरुण सावली व सावली ते मुल या मार्गे सुरू करावी, या मार्गे सुरु केल्यास सोनापूर सामदा, व्याहाड (बुज.) चे प्रवासी गडचिरोली जाणारे मोठ्या व्याहाड बुजच्या बस स्टॉप वर उतरतील व आपले प्रवासी वाढतील तसेच ही बस व्याहाड (खुर्द) मार्गे केल्यास केरोडा, कोडेखल, घोडेवाही, जाणारे प्रवासी मिळतील.
करीता विद्यार्थ्यांना व पालकांना सुविधा होईल अशी मागणी अविनाश पाल यांनी केली.

ही बस गडचिरोली वरुन स. ८.०० वा. सोडण्याचे करावे, तसेच वापस मुल वरुण येणारी उलट मार्गे दुपारी १.३० ते २.०० या दरम्याम व सांय. ४.०० वाजता मुल वरुण सुरु करा.

सदर निवेदने माजी मंत्री तथा आमदार सुधिर मुंनघटीवार, खा.अशोकजी नेते, गडचिरोली आगार व्यवस्थापक वाडीभस्मे यांना भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.