दुचाकीला रानडुक्कराची धडक बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

59

राजुरा(प्रतिनिधी)-
सकाळीच शेताचे कामासाठी दुचाकीने जात असताना रानटी डुक्कराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात गोंडपीपरी तालुक्यातील फुरडी हेटी गावातील अविनाश भगवान निखाडे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नेहमी प्रमाणे अविनाश शेतीचे कामासाठी आपल्या दुचाकीने निघाला शेती काही अंतरावर शेतातून आलेल्या रानटी डुक्कराची दुचाकीला जबर धडक बसली यात भगवान दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने डोक्याला गँभिर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थानी उपचारासाठी गोडपीपरीला हलविले परंतु मृत्यू झाल्याची डाँक्टरनी घोषित केले
दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी चे पोलीस कर्मचारी वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक राजेंद्र लडके, वनरक्षक संजय पेंदोर,महिला वनरक्षक वर्षा उरकुडे यांनीही मोक्यावर जाऊन पंचनामा केला आहे.

या भागात रानटी डुक्कराचा धुमाकूळ असून शेतीचे प्रचंड नुकसान करीत आहे अश्यातच डुक्कराचे धडकेत युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यानी रानटी डुक्कराचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत वनविभागाने मृतक शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे