Home
Homeमहाराष्ट्रमाजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;64 रक्तदात्यांनी केले...

माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;64 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

सावली तालुका भाजपाच्या वतीने केले आयोजीत
ब्रम्हपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या 64 व्या वाढदिवसा निमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सावली येथील बाजार समिति च्या सभागृहात करण्यात आले.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

रक्तदान हे जीवनदान आहे.भविष्यात निर्माण होणारी रक्ताची समस्या लक्ष्यात घेता माजी आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिनानिमित्य सावली तालुका भाजपा अंतर्गत सामाजिक बांधीलकी जोपासत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुण सामाजिक भावना जोपासल्या गेली.

 

भाजपा सावली तालुका व शहर तर्फे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.

माजी आमदार प्रा.अतुल देशकर सह जिल्हा संघटन मंत्री संजय गजपुरे,तालुकाध्यक्ष अविनाश पाल,तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,माजी.जि.प.सदस्य संतोष तंगडपल्लीवार,देवराव मुद्दमवार,प्रकाश पा.गड्डमवार,अर्जुन भोयर,निखिल सुरमवार,शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,युवा तालुकाध्यक्ष विनोद धोटे,रवी बोलीवार,किशोर वाकुडकर,कुनघाडकर सर,कृष्णा राऊत,प्रवीण सुरमवार, गौरव संतोषवार,अतुल लेनगुरे,अंकुश भोपये,राकेश कोंडबतूनवार,महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेविका निलम सुरमवार,नगरसेविका शारदा गुरनुले ,महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई शेरकी,उपाध्यक्ष प्रतिभा बोबाटे,महिला शहराध्यक्ष गुड्डीताई सहारे,माजी जि.प. सदस्य मनिषा चिमुरकर,माजी जि.प.योगिता डबले,पं.स.सदस्य छाया शेंडे, शोभाताई बोगावार, संगीता उतूरवार,भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

64 रक्तदात्यांना प्रा.देशकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरीश जक्कुलवार,राकेश गोलेपल्लीवार, मुकेश सहारे, मयूर गुरनुले, शुभम कटारे,किशोर गुरुनुले,अनिल माचेवार ,राकेश कटकमवार,राजेश रापेल्लीवार,अंबादास गुरूनुले,सुरेश ढोले,संगीता वाघ,मीना मोहूर्ले,सिंधू मराठे,यांच्या सह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

रक्तदान शिबिराच्या निमित्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली ब्लड बैंक यांच्या विशेष सहकार्यातु सदरच्या उपक्रमाला गति निर्माण होता आहे यावेळी ब्लड बैंक चे रक्त संक्रमण अधिकारी डॉ अशोक तुमरेटी, रक्त वैद्य अधिकारी प्रफुल राउत, विजया मांदाळे,गायत्री चिचघरे अधिपरिचारीका नीलेश सोनवणे प्रमोद देशमुख,बंडू कुंभारे यांचे विशेष सहकार्य लाभले. सावली तालुका भाजपच्या वतिने आयोजित रक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !