
राजुरा(प्रतिनिधी)-

फेरफार प्रकरणात लाच मागितल्याचे आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून राजुरा तालुक्यातील सास्ती साझ्याचे महिला तलाठी यांना लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी सापळा रचून ताब्यात घेतल्याची घटना आज दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी घडली आहे
सास्ती शिवारात फिर्यादी यांनी एक शेत खरेदी केलेलं होते खरेदी विक्री चे सर्व कागदपत्रे देऊनही सास्ती साझ्याचे महिला तलाठी यांनी फेरफार करण्यास वेळकाढूपणा करीत पैशाची मागणी करीत अर्जदार यांना याचा संशय आल्याने व आगाऊ पैसे देण्याची फोन द्वारे मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालायात रीतसर तक्रार केली सर्व प्रकरणाची पळताळणी करून आज सास्ती येथील त्या महिला तलाठी यांना फेरफार प्रकरणात आगाऊ पैसे मागितल्याचे स्पष्ट झाल्याने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने महिला तलाठीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे बातमी लिहिपर्यत कारवाई सुरू होती
आठवळ्यापूर्वीच याच तालुक्यातील वरूर येथील तलाठी याचे वरही लाचलुचपत प्रकरणी कारवाई झाली होती त्याची शाई वाळते ना वाळते आज याच तालुक्यात अश्याच प्रकरणात दुसरे तलाठी अडकल्याने महसूल विभागावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही असा सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत अशे
