विद्युत विभागाच्या निष्काळजीने शहाबुद्धिन शेख या शेतकऱ्याचा मृत्यू.

68

 

विरुर स्टेशन (संतोष मडपूवार) :-
– राजुरा तालुक्यातील मौजा भेंडाळा येथील शहाबुद्धिन गफ्फार शेख या अंदाजी वय ४० वर्षीय शेतकऱ्याचा शेतात पडून असलेल्या विद्युत विभागाच्या जिवंत तारेच्या स्पर्शाने करंट लागून मृत्यू झाला. शहाबुद्धिन शेख हा मुळचा चिचबोडी येथील रहिवासी असून भेंडाळा येथील तलावाच्या पारी जवळील शेतात काम करीत होता. शेती चे काम करीत असताना येथे आधी पासूनच तुटून पडलेल्या विद्युत तारे च्या करंट मुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

येथे वीजेची तार तुटुन असतानाही विद्युत विभागाने कोणतीही दखल न घेता, येथील विज पुरवठा खंडित न केल्याने एका तरूण शेतकर्‍याला जीव गमवावा लागला हे बघून चंद्रपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनु धोटे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत विज विभागाला धारेवर धरले. शेवटी विद्युत विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी मृतकाचे परिवारास विद्युत विभागाकडून ४ लाखाची तात्काळ मदत जाहीर केली. तसेच मृतकाचे परिवारास २० हजार रुपयांची शीघ्र मदत केली आहे.

या प्रसंगी विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण, विद्युत अभियंता मकासरे, पोलीस पाटील बंडू रागीट, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश गुरणुले, ईरशाद शेख, धनराज रामटेके, सतीश साळवे, विनोद धुमळे, दिनकर ठमके यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक गावकरी उपस्थित होते.