
भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठ मानव विज्ञान विद्याशाखा च्या अधिष्ठाता पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रमौली यांचा सत्कार भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या शुभ हस्ते तसेच संस्थेचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल स्वामी , संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. विजयराव शेंडे, प्राचार्य हिराजी बनपुरकर संस्थेचे सदस्य सुनील बल्लमवार , नवनियुक्त कार्यकारी प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी प्रा. प्रशांत वासाडे, डॉ. प्रेरणा मोडक, संजय पडोळे यांनी डॉ. चंद्रमौली यांच्या एकूणच प्राचार्य म्हणून कारकिर्दीवर प्रकाश टाकून आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. चंद्रमौली यांचा गौरव केला.

प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर यांनी डॉ. चंद्रमौली म्हणजे अखंड वाहणारा खळखळता झरा असून सतत कार्यप्रवण असणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळेच या उच्च पदापर्यंत पोचले असा गौरव केला. डॉ. विजयराव शेंडे यांनीही प्राचार्य चंद्रमौली आणि आपला स्नेहसंबंध सांगतानाच सरांचा कार्यकुशल आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. संस्थेचे सचिव आदरणीय राजबाळ पाटील संगीडवार साहेब यांनीही चंद्रमौली सरांच्या एकूणच कारकीर्दीचा गौरव पूर्ण उल्लेख केला.
संस्थेचे अध्यक्ष तथा या सोहळ्याचे अध्यक्ष संदीप गड्डमवार यांनीही प्राचार्य चंद्रमौळी सरांच्या कार्यकुशलतेमुळेच आज महाविद्यालय प्रगतीच्या शिखरावर आहे असे गौरवपूर्ण उद्गार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. चंद्रमौली यांनीही संस्थेने मला प्राचार्य पदाची संधी दिली माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे हे यश मला प्राप्त करते आले असे भावपूर्ण उद्गार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनियुक्त कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांनी केले तर आभार डॉक्टर राजश्री मार्कंडेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत वासाडे प्रा. सगानंद बागडे माननीय संजयजी पडोळे तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
