बिबट्याच्या कातडीसह 5 आरोपी ताब्यात ; नागपूर व गोंदिया वनविभागाची संयुक्त कार्यवाही

54

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
नागपूर वनविभागास गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करुन गोंदिया विभागाच्या पथकासह संयुक्त कार्यवाही करुन बिबट्याची कातडी व पांगोलिन खवल्या माजरचे खवले सह 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून गोंदिया येथे बीबट कातडी ची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यावर वन विभाग नजर ठेवून होतें.
आज दिनांक 23 जुलै ला सापडा रचून तस्करी करणाऱ्या 5 ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
असून निखिल नीलकंठ आगडे, कैलास काशिनाथ घुमके, हेमराज ओंकार उके, मिथुन छबिलाल घुमके, मनोज नारद मानकर अशी आरोपीचे नावे आहेत. आरोपि कडून बिबट कातडे 1 नग, खवल्या मांजर चे खवले – 3.25 kg आणि तीन दुचाकी वाहन क्रमांक MH 35- 7939 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 च्या विविध कलामा द्वारे वनगुन्हा नोदविण्यात आला. सदर सापडा सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र, जांभळी उपक्षेत्र, डोंगरगाव/खजरी नियतक्षेत्रात रचण्यात आला.
सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर चे रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक राहुल गवई,, उपवनसंरक्षक, नागपूर, कुलराज सिंह,, उपवनसंरक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनात विभागीय वनाधिकारी(दक्षता) पी. जी. कोडापे, , सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, , श्री पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ . वनपरिक्षेत्र अधिकारी,वाय डी ताडाम , निलेश तावाडे , गणेश जाधव,दिनेश पडवळ, विनोद शेंडे , सुधीर कलुरकर , संदीप धुर्वे आणि सडक अर्जुनी येथील कर्माचारी यानी सापडा यशस्वी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली. पुढील तपास गोंदियाचे सहायक वनसंरक्षक प्रदीप पाटील करीत आहेत.