खेडी जवळ दुचाकी- ट्रकच्या अपघात एक जण गंभीर जखमी

50

 

सावली तालुक्यातील चंद्रपूर गडचिरोली मुख्य मार्गावरील खेडी जवळ गडचिरोली वरून मुलकडे जाणाऱ्या एका ट्रकने सावली वरून भादूरणा ला जाणाऱ्या एका दुचाकी स्वरास उडविल्याने सदर अपघातात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झालेला आहे.

 

मूल तालुक्यातील भादूरणा येथील दिलीप सोनुले असे या जखमीचे नाव आहे. या अपघाताची माहिती खेडीवासींना कळताच त्यांनी सावलीचे माजी सरपंच अतुल लेनगुरे यांना माहिती दिली हे घटनास्थळी दाखल होताच त्यांनी जखमीला सावली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केलेले आहे. अपघातावर उपचार सुरू असून सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेले आहे.