सावली शहरातील नप चे गाळेकिराया भाव वाढ कमी करावी- गाळेधारकांचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन

71

 

सावली शहरांमध्ये नगरपंचायत च्या वतीने असलेले व्यापार करण्यासाठी गाळे आहेत मात्र गाळे धारकांचे किराया हे मोठ्या प्रमाणामध्ये केल्याने ते अन्यायकारक असून ती कमी करण्यात यावी या संदर्भातून सावली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनीषा वजाळे नगराध्यक्ष लता लाकडे,उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार यांनां येथील गाळे धारकांनी निवेदन दिलेले आहे. सदर भाववाढ कमी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी गाळे धारकांचे म्हणणे नगराध्यक्ष लता लाकडे यांनी एकूण घेवून यावर नक्की तोडगा काढू असे आश्वासन सर्व गाळेधारकांना दिले.