Home
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टीमुळे आपादग्रस्तांना त्वरित मदत करा.

अतिवृष्टीमुळे आपादग्रस्तांना त्वरित मदत करा.

 

 

*=============================================

ब्रह्मपुरी :

राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा दिला. यावेळी अतिवृष्टीमुळे आपदग्रस्तांना त्वरित मदत करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

पूर व अतिवृष्टीमुळे शेतीचे व पडलेल्या घरांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, आपादग्रस्तांना योग्य तो मोबदला सरसकट देण्यात यावा सोबतच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची मागणी माजी आमदार देशकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा व गांगलवाडी गावाजवळील नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करणे, व लाडज, रणमोचन, खरकाडा या गावांचे पुनर्वसन करणे व पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचीही मागणी या वेळी अतुल देशकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण बाबींवर सविस्तर चर्चा करत यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन माजी आमदार अतुल देशकर यांना दिले. याप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा नगर महामंत्री मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदुरकर साकेत भानारकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर व नितीन बोदेले उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !