अखेर त्या युवकाची जीवन मरणाची झुंज संपली

55

 

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
मेंदूज्वर झालेल्या त्या युवकावर उपचारासाठी ग्रामस्थ व प्रशासनाने अथक प्रयत्न केले,अडथळे पार करीत नागपूरला भरती केले परंतु त्या युवकाचा जीवन मरण्याची लढाई संपली,रात्री बाराचे सुमारास त्याचा मृत्यू झाला मृत्यूची वार्ता गावात समजताच रात्रीच गाव जागा झाला आणि हळहळ व्यक्त करू लागला तहसीलदार आणो पोलिसांनाही दुःख आवरता आले नाही.

ही दुर्दैवी घटना गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील आहे साहिल कालिदास वाघाडे असे त्या मुलाचे नाव आहे गावाला पुराचे पाण्याने वेढा घातला होता त्यात साहिल ला मेंदूज्वर झाला गावातील डाँक्टर नि तो गंभीर असून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला नेण्याचा सल्ला दिला परंतु पुराचे पाण्यातून कसे न्यायचे विचार करीत असताना गावातील सामाजिक तहसीलदाराणा कळविले आणि त्या युवकास नावेने पुराचे पाण्यातून पलीकडे नेण्यात आले तहसीलदार सुद्धा वाहन घेऊन घनदाट जंगलातून पर्यायी मार्गाने निघाले परंतु वाटेत मोठे झाड पडून असल्याने मोक्यावर पोहचू शकत नसल्याने रुग्णास परत गावात नेऊन उपचार करण्याचा सल्ला तहसीलदारांनी दिला रात्र कशीबशी काढली लगेच दुसरे दिवशी कोठारीचे ठाणेदार वनकर्मचारी वाटेतील झाड तोडून मार्ग मोकळा केला आणि परत त्या रुग्णास पोलिसांनी उपचारासाठी घेऊन गेलेत ग्रामस्थ त्याच्या बरे होण्याची प्रार्थना करू लागले तब्बेत जास्त बिघडल्याने नागपूरला हलविले त्याचा युवकाचा या संकटांशी आणि जीवन मरणाशी झुंज सुरू होती नशीब परीक्षा घेत होता परंतु या झुंजीत अखेर त्या युवकाचा रात्री बारा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

मृत्यूची बातमी समजताच तोहोगाव वासी रात्री जागे झाले आणि हळहळ व्यक्त करीत शोक व्यक्त करू लागले तहसीलदार आणि ठाणेदारांनाही ही माहिती मिळताच त्यांनाही दुःख आवरता आले नाही
ग्रामस्थ ,प्रशासनाचे अथक प्रयत्न आणि नशीबापुढे मृत्यूच्या झुजित त्या युवकाचा मृत्यू झाला
कुटूंबात एकुलता एक मुलाचा असा मृत्यू झाल्याने कुटूंबावर दुःखाचा डॉगर कोसळला आहे