
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
वनक्षेत्रात नैसर्गिक रित्या उन्मळून पडलेले झाडाचा योग्य विल्हेवाट लावल्या जात नसल्याने वन विभागाचा महसूल बुडत असून ही पडलेली झाडे वन विभागाचे दुर्लक्षित कारभारात तस्करासाठी वरदान ठरत आहे
वनक्षेत्रात नैसर्गिकरित्या साग झाडासह इतर प्रजातीचे बरीच झाडे उन्मळून पडलेले आहेत अश्या झाडाचे अंदाजपत्रक करून त्याची व्यवस्थित तोड करून विक्री आगारात आणल्या जाते आणि ते लिलावात विक्री केल्या जाते त्यातून वनविभागास महसूल मिळतोच आणि जंगलात अवैध वृक्षतोड तथा तस्करीला आळा बसत असते.

परंतु मागील काही वर्षांपासून मध्य चांदा वन विभागात नैसर्गिक रित्या उन्मळून पडलेल्या झाडाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे परिणामी ही पडलेली झाडे काही तस्कराकडून तोडून त्याचा वापर होत असल्याचे समजते यामुळे तस्कर मालामाल होत असताना सम्बधित वनरक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वन्यप्रेमी नि केला आहे
प्राप्त माहिती नुसार काही वनपरिक्षेत्र अंतर्गत वनकर्मचार्यानी पडझड झालेल्या झाडाचे मोजमाप आणि अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयात पाठविले परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही
