जांब बूजरुक ची कु.मोहिनी आकाशवाणीवर… ; जिल्हा परीषद शाळेची विध्यार्थीनी

46

 

सावली तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा जांब बुज. ने कोरोना काळात राबविलेल्या उपक्रमाची दखल नागपूर आकाशवाणीने घेतली असून कु.मोहिनी ओमदेव वडुले या इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी ची मुलाखत मंगळवार ला प्रसारित होत आहे.

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तर्फे २ वर्षापासून कोरोना काळात शाळा बंद असताना, शाळा बाहेरील शाळा हा आकाशवाणी वरील उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे चालू आहे या कार्यक्रमाचे आता पर्यंत 326 भाग पूर्ण झाले आहे या कर्यक्रमा च्या 327 भागा करिता कुं.मोहिनी ओमदेव वडुले विद्यार्थीनी सहभागी झाली आहे दिलेला अभ्यास “च’ या अक्षरापासून तयार होणारे जास्तीत जास्त शब्द बनवा. उदा. चहा” माहिती मिळवा व सांगा.”327वा भाग वर मंगळवारी सकाळी १०.३५ वाजता नागपूर च्या आकाशवाणी वरून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांब बुज. विद्यार्थिनीचा सहभाग आहे.यामध्ये विद्यार्थ्यांचे तीन गट केले आहेत.

पहिला गट अंगणवाडी ते इयत्ता दुसरी, दुसरा गट इयत्ता तिसरी ते पाचवी व तिसरा गट इयत्ता सहावी ते आठवी आहे.यामध्ये प्रत्येक गटासाठी एक प्रश्न विचारला जातो.त्याचे उत्तर विद्यार्थ्यांकडून घेतले जाते.प्रत्येक कार्यक्रमात कोणत्याही गटातील एका विद्यार्थ्यांला सहभागी होण्याची संधी दिली जाते.

सदर प्रसारणात मंगळवार दि. १९ जुलै २०२२ रोजी येथील इयत्ता २री विद्यार्थिनी कु.मोहिनी ओमदेव वडुले व तिची आई सौ. वंदना ओमदेव वडुले या सहभागी होणार आहे. सहभागाबद्दल मुख्याध्यापक सुरेश जिल्हेवार,वर्गशिक्षिका कु.वृषाली पुन्यप्रेड्डीवार शाळेतील शिक्षकवृंद कु.वंदना गाजर्लावार,श्री. निकेश आत्राम,श्री. संदीप कोहळे सर, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे जिल्हा समनव्यक मंगेश ढगे ,वैभव निर्मळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाल,उपाध्यक्ष व कार्यकारणी तथा सावली तालुका पत्रकार संघाचे कार्यकारिणी ने कु.मोहिनीचे कौतुक केले.