सकमुरचा शेतकरी ठरला एमएसईबीच्या निष्काळजीपणाचा बळी. ; कालवड हाकलताना करंट लागून जागीच मृत्यू.

39

गोंडपीपरी(प्रतिनिधी)-
शेतात चराई करता बैला सोबत नेलेले कालवड हाकलत असताना मोटार पंपाच्या विद्युत पुरवठा करिता उभारलेल्या खांबातून प्रवाहित असलेल्या विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाल्याने गोडपीपरी तालुक्यातील सकमूर येथील शेतकरी राजेश्वर तोहगावकर (59) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 16 जुलै रोजी घडली.

संततधार पावसामुळे संपर्क मार्ग बंद आहेत. गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे बंद आहे अशा परिस्थितीत जनावरांची उपासमार होऊ नये म्हणून मोकळ्या शेतात सकाळच्या दरम्यान राजेश्वर तोहोगावकर दोन बैल आणि कालवड चरावयास घेऊन गेले. दरम्यान जनावरांचे मागे जात असताना आडव्या पडलेल्या खांबाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित आहे हे माहीत नसल्यामुळे राजेश्वर तोहगावकर यांनी तारा च्या जवळ जाऊन वासराला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्युत प्रवाह चालू होता व जमीन ओली होती आणि त्याचा स्पर्श होताच करंट लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शेजारी बैल चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याने दूरध्वनी द्वारे गावात संपर्क करून घडलेली घटना सांगितली आणि गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे यांचे शी संपर्क केला व पोलिसांसह घटनास्थळ गाठले. व घटनेचा पंचनामा केला.
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक रेचनकर व गावकऱ्यांनी हा एमएसईबी कार्यालयाच्या निष्काळीपणामुळे झालेला मृत्यू असून एमएसईबी ने मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करीत संताप व्यक्त केला आहे