
राजुरा,प्रतिनिधी-
वर्धा नदीला पूर आल्याने बल्हारशाह हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग बंद झाला परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली त्यामुळे ट्रकांच्या लांब रांगा लागल्या होत्या त्या वाहनाचे चालक आणि कंडक्तरचे जेवणाची गैरसोय होऊ नये या उदात्त हेतूने राजुरा शहराचे जवाहरनगर वार्डातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश तिवारी,तुळशीरामजी टिकले,सुनील वाढई, यांनी स्वखर्चातुन मसाला भात या चालक व कंडक्टर यांना वितरित केले सोबत पिण्याचे पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली
या अन्नदात्याच्या अश्या सामाजिक कृत्यातून ट्रक चालकांनी समाधान व्यक्त केले.
