
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगावला वर्धा नदीला पूर आल्याने पाण्याने वेढले गेले आहे आणि गावातील साहिल कालिदास वाघाडे या मुलाला ब्रेन मलेरिया असून तो गँभिर असल्याने तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतातच आई वडील समोर प्रश्न पडला,,गावातील प्रमुख लोकांसमोर आपबीती सांगितली माजी उपसरपंच फिरोज पठाण यांनी तहसीलदारांना फोन करून गँभिरता सांगितली तहसीलदारानेही वेळ न घालविता कन्हाळगाव कॅम्प नंबर 4 मार्गे आंबूलन्स घेऊन स्वता आलेत इकडे गावकर्यानी त्या रुग्ण व पालकांना नावेने पुराचे पाण्यातून नेण्याची व्यवस्था केली तहसीलदार त्या रुग्णास नेण्याची वाट पहात होते परंतु सुमारे चार किलोमीटर अंतर समोर मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहन जाऊ शकत नव्हते इकडे जीव वाचविण्याची धळपळ आणि तिकडे अडथळे आवासून उभे होते अखेर निराश होऊन त्या रुग्णास परत गावातच आणून प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करून उपचार सुरू आहे.

पुराचे पाणी गावाला वेढले असल्याने त्या रुगणाचे जीवनाशी खेळ सुरू आहे प्रशासन व नागरिक हतबल होताना दिसत आहे त्यामुळे गावाला या संकटातून वाचविण्यासाठी उंच पूल बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे परंतु आजची रात्र मात्र त्या रुग्ण व पालकासाठी नशिबाचा खेळ आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.
