मोठ्या तलावाच्या पाडीला पडले भगदाड तहसीलदार घटनास्थळी दाखल

133

 

सावली शहरा लगत असलेल्या मोठ्या मामा तलावाला भगदाड पडल्याने तिथून पाणी वाहत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी त्या प्रभागाचे नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्याकडे केली असता घटनास्थळी जाऊन बघून नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी या संदर्भातून माहिती सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील यांना दिली. त्यानंतर तहसीलदार पाटील हे मंडळ अधिकारी, तलाठी, सिंचन विभागाचे अभियंता व इतर कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.

मालकी मालगुजारी मोठा तलावाचा पाळीतून एक मोठा छिद्र पडल्याने तिथून पाणी पाहत असल्याचे दिसून आले त्यानंतर भविष्यात या ठिकाणी मोठी हानी होणार असल्याचे दिसल्याने सदर छिद्र बुजवण्याची प्रक्रिया करण्यात आली.यावेळी नगरसेवक सतीश बोम्मावार,मोहन गाडेवार शंकर दिकोंडवार,विलास आकुलवार,राकेश गोलपल्लीवार यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते.