
सावली तालुका हा भात पिकाच्या तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यांमध्ये 90% हे शेतकरी आहे आणि शेतीवरच आपल्या कुटुंबाच्या उदारनिवार करतात परंतु मागील आठ दिवसापासून सावळी तालुक्यामध्ये सतंधार पाऊस येत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यात घरांची पडझड झालेली आहे त्याचप्रमाणे अनेक कुटुंबाच्या राहण्याच्या प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहे.

तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीकाठी सुद्धा पूर्णपणे भरण वाहत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून आहे शेतकऱ्यांच्या धान्य अति पावसामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उडवले असून शेतकरी वर्ग हा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
सावली तालुक्यातील नुकसानग्रस्त घरांची व शेतीची बांधावर जाऊन पाहणी करून त्वरित पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत पुरवी अशी मागणी सावली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे या संदर्भातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावली तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आली आहे.
यावेळी सावली तालुका भाजपा महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजपा शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, नगरसेविका नीलम सुरमवार, नगरसेविका शारदा गुरुनुले, भाजपा महिला शहराध्यक्ष गुड्डी सहारे, भाजपा युवा नेता कृष्णा राऊत,निखिल सुरमवार, प्रसाद जकुलवार,राकेश गोलेपल्लीवार आंनद यलचलवार, कोटरंगे या प्रमुख पदाधिकारी सह कार्यकर्ते यावेळी उपस्तीत होते.
