घरकुल न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त-यादी मध्ये हेरापेरी केल्याचा आरोप…

40

 

हिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामस्थांना ज्यात अंध,अपंग,विधवा,भूमिहीन व इतर अश्या गरजूंना त्वरित लाभ द्या व ग्रामपंचायत अंतर्गत जी कामे झाली त्यात रोजगार असलेल्या मजुरांना वर्षभरापासून मजुरी मिळाली नाही त्यामुळे येत्या दिवसात मागणी मान्य न केल्यास कुटुंबासहित आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आज दिनांक-15/07/2022 ग्रामपंचायत हिरापुर येथे हिरापुर ग्रामस्थ महिला व पुरुष बहुसंख्येने घरकुल ची मागणी व विहीर दुरुस्ती बांधकामावर काम केलेल्या कामगाराची एक वर्षापासूनची न मिळालेली मजुरी यासाठी ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच संवर्ग विकास अधिकारी सावली यांना जन अक्रोषात निवेदन देण्यात आले.

यावेळी अतुल कोडापे जिल्हा अध्यक्ष अ. भा. आदिवासी विकास परिषद चंद्रपूर, अनिल बोटकावार जिल्हा अध्यक्ष अ.भा. मादगी समाज संघटना चंद्रपूर , तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर उईके, माजी सरपंच बंडु मेश्राम,विनायक गेडेकर, प्रकाश जवादे,प्रभाकर गेडेकार, मुखरू मडावी,हरिदास पेंदाम, सुरेश नागापुरे, मिथुन आत्राम व शेवंता पेंदाम, कवलाबई आत्राम, प्रभाबाई मेश्राम, मायाबई मडावी, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.