
विदर्भातील चंद्रपूर भंडारा गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी नाले प्रचंड वेगाने दुताडी भरून वाहत आहेत त्यामुळे सर्वत्र सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने केंद्रीय जल आयोगाच्या आदेशानुसार पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 7000 ते 8000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असल्याचा सूचना प्राप्त झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे आदेशानुसार गावागावात दवंडी देऊन सतर्क राहण्याचा इशारा वैनगंगा नदी काटा लागतील गावातील नागरिकांना देण्यात आला आहे.
याबाबत स्थानिक प्रशासनातर्फे
सर्व ग्राविअ /ग्रामसेवक तथा तलाठी यांच्यासह ग्रामपंचायतीना कळविण्यात आले
*लाडज चा संपर्क तुटला*
लाडज गावाचा संपर्क तुटला
ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावाला नेहमी बेटाचेस्वरूप प्राप्त होते सदर गावाच्या भोवताल महापूर होत असल्यामुळे त्या गावासाठी धोक्याची घंटा आहे
सन २०१४ ते २०१५ मध्ये या गावचा डोंगा पाण्यात बुडालेला होता त्यामुळे स्थानिक प्रशासन जास्त रिक्स घ्यायला तयार नाही
शिवाय ज्यांच्याकडे डोंगेआहेत अशा व्यक्तींना जास्त प्रवाहात डोंगे टाकण्यास स्थानिक प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.
त्यामुळे लाडज गावातील एखाद्या दवाखाना किंवा इमर्जन्सी शेड्युलमध्ये गरज पडल्यास त्यांना पर्याय नाही त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लाडस गावाच्या संपर्काशत राहावे अशी विनंती प्रशासनाला गावकऱ्यांनी केली आहे.
नागरीकाना सर्तकतेचा इशारा