
हरांबा प्रतिनिधी
मोहीत मुद्दमवार
सावली तालुक्यातील उपरी गावातील श्री. श्यामसुंदर सावकार चीटमलवार रा.उपरी यांच्या गोडाऊन मधे नाग साप निघाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या सुमारास गोडाऊन मधे नाग सापाला बघताच धकसा जीव झाला. पण त्या सापाला मारण्याचा दुष्ट विचार न येता सापाला जिवंत पकडण्यासाठी संबंधित गोडाऊन मालकांनी सर्पमित्राला बोलावले.खेड्यात नाग सापाला देव मानले जाते व पूजा ही केली जाते.

साप हा पर्यावरण संतुलन राखणारा एक घटक आहे. त्याचप्रमाणे अन्नसाखळीतील महत्वाचा भाग असल्यामुळे शासन साप बचाव मोहीम राबवत असते.परंतु खेड्यात साप निघाल्यास लोक मारण्यासाठी धावत असतात.पावसाळ्याचे दिवस असल्याने साप आपले घर सोडून अन्न व निवाऱ्यासाठी भटकत असतात आणि लोक वस्तीत येऊन घराचा आसरा घेत असतात.
असाच प्रकार तालुक्यातील उपरी येथील श्यामसुंदर सावकार चिटमलवार यांच्या गोडाऊन मध्ये नाग साप असल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. लोकांना विचारले असता साप हा गोडाऊन मधे गेला असल्याची माहिती दिली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने त्या नाग सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. चक्क एक तासांनी नागाला पकडण्यात यश मिळाले. गाववासीयांनी सर्पमित्राचे आभार मानले. सापाला पकडल्यामुळे जीवितहानी टळली व सापला जीवनदान मिळाले.
साप पकडण्यासाठी सर्पमित्र चिंतामण तारके, आकाश बोबाटे, विकास पोटे,हे होतें यांना मोलाचे सहकार्य सुद्धा मिळाले.